कन्नड : प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत शहरी भागातील लाभार्थ्यांना वेगळे , तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कमी अनुदान असा ग्रामीण व शहरी भेदभाव न करता , केंद्र सरकारने सरसगट पाच लाख रुपये अनुदान द्यावे , अशी मागणी शिवसेना नेते तथा जि . प . चे माजी अध्यक्ष डॉ . आण्णा शिंदे , अंधानेर सरपंच अशोक दापके , सोपान गोलाईत यांनी केंद्रीय मंत्री डॉ . भागवत कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . घर बांधण्यासाठी लागणाऱ्या लोखंड , वाळू , सिमेंट , बांधकाम मजुरी इतर सर्वच साहित्याचे दर गगनाला भिडले असून , शहरी भागासाठी अडीच लाख तर ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपये इतकेच अनुदान लाभार्थ्यांना मिळते . घर बांधण्यासाठी जो खर्च शहरी भागात लागतो , तोच खर्च ग्रामीण भागातही लागत असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या कमी अनुदानाने ग्रामीण भागाच्या लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे . यामुळे ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता सरसगट पाच लाख रुपये अनुदान घरकुलासाठी देण्याची मागणी डॉ . आण्णा शिंदे यांनी केली आहे . यासंदर्भात केंद्रीय मंत्री डॉ . भागवत कराड यांना निवेदन देण्यात आले . यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते , सरपंच अशोक दापके आदी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
चित्तौड़गढ़ जिला फुटबॉल संघ के चुनाव निरस्त करने को लेकर गठित जांच के विरुद्ध जिले के मान्यता प्राप्त विभिन्न फुटबॉल क्लबो के सचिवों व पदाधिकारियों ने दिया ज्ञापन
चितौड़गढ़
फ़रीद खान
चित्तौड़गढ़ जिला फुटबाल संघ के चुनाव निरस्त करने को लेकर गठित जांच के...
MCN NEWS| अवैध दारू वाहतूक करणाऱ्यास वीरगाव पोलिसांनी केले जेरबंद
MCN NEWS| अवैध दारू वाहतूक करणाऱ्यास वीरगाव पोलिसांनी केले जेरबंद
स्वर्गीय माननीय रंजीतसिंहजी चुंगडे यांचे तिसरे पुण्यस्मरण
स्वर्गीय माननीय रणजीतसिंहजी चुंगडे यांचे तिसरे पुण्यस्मरण दिनानिमित्त हिंगणा रोड हनुमान मंदिर...