तालुक्यातील ढेकणमोहा येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी' क्र. 2 येथे पशुधन लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू केली. शेतकऱ्यांच्या पशुधनाला लम्पी आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली
या मोहीम साठी पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी वेळो वेळी संपर्क साधला आणि मोहीम सुरू करावी असे सांगण्यात आले. या लसीकरण मोहीम साठी ढेकणमोहा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. बी. शिंदे, नागेश शिंदे माजी सरपंच ढेकणमोहा, जेष्ठ नेते कैलास देवकते पाटील, श्रीहारी थापडे, भगवान देवकते पाटील, भगवान थापडे, भागवत भोगे, पत्रकार विनोद शिंदे, अरुण शिंदे, रामकिसन करांडे, कैलास ठाकुर, दिनेस पिसाळ, महादेव शिंदे, आनंद शिंदे, शहादेव शिंदे, शरद शिंदे, पदमाकर साळवे, साईनाथ निसर्गध, निखिल थापडे,बाबुराव दिपक, राऊत दिनेश, विकास शिंदे, राजेंद्र साळवे आदी उपस्थित होते. या वेळी ढेकणमोहा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. शिंदे यांनी लसीकरणचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.