खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलासाठी लागोपाठ दुसऱ्या वर्षी आज सकाळी  बिंदुसरा नदीपात्रात डुबकी लगाव निषेध आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, डॉ. शेख एजाज, शेख मूबीन, युनूस चरहाटकर, डॉ. संजय तांदळे, आदींचा समावेश होता. आंदोलन स्थळी कुठलीही दुर्घटना किंवा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पेठ बीड पोलीस ठाणे प्रशासन तसेच शहर पोलीस ठाणे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बीड नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व अग्निशमन दलातील कर्मचारी आवश्यक त्या संसाधनासह उपस्थित होते. आंदोलन अत्यंत शांततेने लोकशाही मार्गाने पार पडले. आंदोलनासाठी सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनातील एपीआय नारायण एकशिंगे, पीआय रवी सानप आणि अन्य पोलीस कर्मचारी तसेच नगरपरिषदेचे प्रतिनिधी म्हणून निवेदन स्वीकारण्यास आलेले इंजि. अखिल भाई व अग्निशमन दलातील कर्मचारी वृत्तपत्र प्रतिनिधी वेब पोर्टल प्रतिनिधी, युट्युब प्रतिनिधी, दूरचित्रवाणी प्रतिनिधी या सर्वांनी आंदोलनाची दखल घेऊन सहकार्य केल्याबद्दल तसेच महिला वर्गाने ही येऊन आंदोलनास समर्थन दिल्याबद्दल आंदोलनकर्ते तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास यांनी आभार व्यक्त केले तसेच पुलाच्या कामास जोपर्यंत प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत दरवर्षी बिंदुसरा नदीपात्रात नियोजित पुलाच्या ठिकाणी डुबकी लगाव आंदोलनाची श्रृंखला सुरूच ठेवणार असल्याचा दृढ निश्चय आंदोलनावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना एस.एम.युसूफ़ यांनी बोलून दाखविला.