रांजणगाव गणपती:- रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव, शेळकेवस्ती येथील भास्कर लांडे यांच्या शेतामध्ये जनावारं चारण्यासाठी गेलेले कैलास पांडुरंग दुंडे यांना (दि 22) गुरे चारत असतांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी पाहिले असता शेतातील लिंबाच्या झाडाजवळ एक चार ते पाच महिन्याचे पुरुष बालक बेवारस अवस्थेत दिसुन आले होते. त्यामुळे कैलास पांडुरंग दुंडे यांचे फिर्यादीरुन रांजणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बालकाला त्याचीच जन्मदाती आई किरण संजय जगताप (वय 26) रा. कोंढापुरी ता शिरुर जि पुणे मुळ रा. जळगाव ता. बारामती जि पुणे हिने रांजणगाव गणपती येथे सोडले असल्याचे सिद्ध झाले असुन (दि 23) रोजी रांजणगाव MIDC पोलिसांनी किरण जगताप हिला अटक केली करत न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सदर आरोपीला आज (दि 26) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा या आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीस (दि 28) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे करत आहेत.