पाचोड येथून कामासाठी आलेल्या परराज्यातील युवकांचे अपहरण.

पाचोड/ पैठण तालुक्यातिल पाचोड येथील मोसंबी बाजारपेठमध्ये मध्यप्रदेशवरून मोलमजूरी करण्यासाठी आलेल्या एका सतरा वर्षीय युवकांचे रविवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द सोमवारी दुपारी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की,पाचोड येथील मोसंबीचे व्यापारी सलिम इब्राहीम सय्यद यांनी पाचोड पोलिस ठाण्यांत दिलेल्या तक्रारीत असे म्हटले की,रविवारी (दि 31)जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मी मोसंबी मार्केटमध्ये असताना माझेकडे काम करीत असलेला मुलगा कैलास केदार चौहाण याचा फोनवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून कळविले कि, मुकेश राजाराम लिंगवाल हा आमच्याकडे आहे. त्याने आमचे मोबाईल चोरले आहेत तर तुम्ही आम्हाला तीन लाख रुपये आणुन आणि मुकेश यास घेवुन जा असे म्हणाल्याने आम्ही त्यास (दि 31)रोजी रात्री 07.30 वाजता फोन केला असता ते म्हटले मला म्हणाला कि, माझा मोबाईल एक लाख सत्तर हाजार रुपायाचा व माझ्या आत्याचा मोबाईल हा मुकेश याने चोरून नेला आहे.

त्यामुळे मी त्याला पळुन आणले आहे. त्यावर मी त्यास म्हणालो कि ठिक आहे.मी तुझे तीन लाख रुपये आणुन देतो. तु मला सांग कोठे येऊ तेव्हा तो मला म्हणाला कि तु पैसे औरंगाबाद येथे घेवुन ये असे म्हणाला असाता मी त्याला परत फोन लावला व विचारले कि पैसे कोठे आणायचे आहे. ते सांग त्यावर तो म्हणाला कि तु पैसे घेवुन गेवराई जि. बीड येथे पैसे घेवुन ये त्यानंतर आम्ही पाचोड पोलिस ठाण्यात येऊन या संदर्भात झालेल्या घटने बाबतीत सविस्तर माहीती दिली असुन या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यांत करण्यात आली असुन पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे,उपनिरिक्षक सुरेश माळी हे करीत आहेत.