शिरुर: मोटेवाडी (ता. शिरुर) येथे कृषि विभागाच्या वतीने घटस्थापनाची शासकीय सुट्टी असतानाही शेतकरी कार्यशाळा पार पडली. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहीम अंतर्गत रब्बी हंगाम पुर्व तयारी प्रशिक्षण तसेच कांदा लागवड तंत्रज्ञान आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हवामान आधारित फळपिक विमा योजना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ठिबक सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना अंतर्गत भाजीपाला किट वाटप कार्यक्रम अशा विविध योजनाची माहिती कृषी सहायक जयवंत भगत यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.

कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांनी हॉर्टीसॅप योजनेअंतर्गत डाळींबावरील किड व रोग बाबत माहिती दिली व कांदा लागवड तंत्रज्ञान सांगताना रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक कांतीलाल वीर यांनी रब्बी ज्वारी तंत्रज्ञान बाबत माहिती दिली. तसेच यावेळी शेतकऱ्यांना पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना अंतर्गत भाजीपाला किट वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपसरपंच जीवन जासुद यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमास माजी सरपंच रोहन गवळी, लक्ष्मण कोल्हे,रामभाऊ शिंदे, दशरथ कोल्हे, बाजीराव येलभर, गणेश कोल्हे, अतुल कोल्हे, निलेश येलभर, लहु शिंदे, दगडु गवळी, दत्ता कोल्हे, रमेश जासुद, सौरभ येलभर, सुहास येलभर, शाम येलभर यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार गणेश कोल्हे यांनी मानले.