माळशिरस तालुक्यातील अकलूज गावचे ग्रामदैवत असणाऱ्या आई अकलाई देवीच्या मंदिरामध्ये आज नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली देवीच्या मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असून नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन मंदिरात करण्यात आले आहे

पहाटे देवीचा महाभिषेक झाल्यानंतर देवीची विशेष महापूजा करण्यात आले आहे मंदिरामध्येच देवीचे पुजारी गुरव परिवाराच्यावतीने घटस्थापना करण्यात आली असून अकलूज गावचे ग्रामदैवत असणाऱ्या आई अकलाई देवीचे नवरात्र उत्सवानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे