ओल्या दुष्काळासाठी खुडज पाटीवर शेतकऱ्यांच्या वतीने भव्य रस्ता रोको 

सेनगाव तालुक्यातील खुडज पाटीवर आज दिनांक 26 सप्टेंबर वार सोमवारी रोजी शेतकऱ्यांच्या वतीने टायर जाळून भव्य रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात येत आहे या वर्षा निसर्गाच्या लहरीपणामुळे सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी होऊन चार कृषी मंडळी अतिवृष्टी निधी मधून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत रस्ता रोको आंदोलन पुकारली आहे त्यामुळे तात्काळ सरसकट सेनगाव तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे तसेच आंदोलन करूनही शेतकऱ्याच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास या पेक्षाही आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकाच्या वतीने देण्यात आला आहे