कन्नड : शिवसेना फुटली आणि विद्यमान आमदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षात थांबल्याने मी शिंदे गटात गेलो . आता माझी लॉटरी लागणार आहे . आगामी काळात विधानसभेत जाण्याची संधी मिळाल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास नक्कीच करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार नितीन पाटील यांनी गुरुवारी केले . कन्नड येथे साने गुरुजी पतसंस्थेच्या सभागृहात जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार पाटील यांच्या अभीष्टचिंतनाच्या निमित्ताने नागरी सत्काराचे आयोजन केले होते . या वेळी ते बोलत प्रास्ताविक केले . डॉ . मनोज पवार यांनी सूत्रसंचालन , तर खरेदी - विक्री संघाचे सभापती सुरेश डोळस यांनी आभार मानले . या वेळी विजयबापू महाले , विश्वास सोनवणे , रामभाऊ ससे , भगवान गिते , कारभारी सोनवणे , ज्ञानेश्वर पवार , बाळासाहेब जाधव , नंदूशेठ जैन , देवमन घुगे , विजय शिंदे , राजू नलावडे , विठ्ठल शेळके , संजय साळवे , दिगंबर गाडेकर , दिनकर वेताळ , रोहिदास जाधव , मनोज देशमुख , कैलास पवार , संतोष थोरात , विलास राऊत , अशोक वाहूळ , किसन राठोड , बबलू जंगले , विश्वास सोनवणे , अविनाश काळे आदींसह तालुक्यातील सरपंच , सोसायटीचे चेअरमन , जिल्हा बँकेचे अधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . होते . पाटील म्हणाले , २० वर्षांपूर्वी राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना मला तालुक्यातील जनतेने आमदार केले . आता तर मी राजकारणात चांगलाच तरबेज झालो असून चांगला राजकीय अनुभवदेखील आला आहे . या वेळी जिल्हा बँकेचे संचालक डॉ . मनोज राठोड , कौतिकराव पवार , अँड . कृष्णा जाधव , राजू चव्हाण , माजी उपनगराध्यक्ष वाल्मीक लोखंडे , डॉ . सिकंदर कुरेशी , खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश डोळस , साहेबराव अकोलकर , धनराज बेडवाल , अण्णामंत्री पवार , आबासाहेब पवार , सुभाष महाजन आदींचीही भाषणे झाली