केज तालुक्यातील मस्साजोग शिवारातील लिंबाच्या झाडाला एका ३२ वर्षीय तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक २५ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी पहाटे साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
तरी या बाबतची अधिक माहिती अशी की सुनील बाबासाहेब कदम वय ३२ वर्षे यांने मस्साजोग शिवाराती मस्साजोग ते हनुमंत प्रिंप्री रोड पासुन दोनशे मिटर अंतरावरील शेतातील लिंबाच्या झाडाला नॉयलन च्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह शवच्छिंदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र विडा येथे पाठवण्यात आला आहे.अत्माहत्या केलेला तरूण गेली अनेक वर्षांपासून औरंगाबाद कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी राहत होता . परंतू तो काही कामानिमित्त गावाकडे आला होता.तरूणाच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,भाऊ,आई वडील आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पुढिल तपास पोलीस करीत आहेत.या घटनेने मस्साजोग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.