अर्धनारीनटेश्वर स्वरूपातील भारतातील एकमेव परळी ची जागृत कालराञी देवी असून नवरात्र उत्सवानिमित्त जयत तयारी झाली आहे
शिव, शक्ती आणि भक्ती चा ञिवेणी संगम असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे परळी चे धन्वंतरी प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग होय.अनेक कालखंडात अनेक देवी, देवता, ऋषी मूनींच्या आणि साधुसंताच्या वास्तव्याने पुनीत असलेल्या परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्राचा महिमा अनन्यसाधारण आहे. असेच एक अद्भुत आणि देशातील एकमेव ठरणारे अर्धनारीनटेश्वर रूपातील माता कालराञी देवी चे जागृत असलेल्या देवीची माहिती शारदीय नवराञी उत्सवा निमीत्ताने परळी वैद्यनाथ पंचक्रोशीचे अभ्यासक गोपाळ आंधळे यांच्या लेखनीतून भाविकांसाठी देत आहोत.
परळी शहरातील जुन्या गावभागतील मांडववेस रोड वर, भीमनगर वस्तीत शहराच्या पुर्वेस कालराञी देवी चे पुर्वाभिमुख अर्धनारीनटेश्वर रूपातील मंदिर आहे.
अर्धनारीनटेश्वर शिवाचे एक रूप. शिवाच्या शरीराचा उजवा अर्धा भाग पुरुषरूप व डावा अर्धा भाग स्त्रीरूप असल्यामुळे ‘अर्धनारी’ आणि गांधर्ववेदाचा तो निर्माता तसेच नृत्यप्रिय असल्याने ‘नटेश्वर’ असे त्यास म्हणण्यात येते. मैथुनोपायाने प्रजानिर्मिती करण्याकरिता ब्रह्मदेवाने शिवाची प्रार्थना केल्यामुळे शिव या रूपात अवतरला. नंतर त्याचे पुरुष व स्त्री असे वेगवेगळे भाग झाले त्यानंतर पुरुषरूपाचे अकरा व स्त्रीरूपाचे अनेक भाग झाले ब्रह्मदेवाच्या क्रोधापासून ‘अर्धनारीरूद्र’ उत्पन्न झाला इत्यादी कथा पुराणांत आढळतात. ‘अर्धनारीश्वर’ ही एक तांत्रिक देवताही आहे. शिव-शक्ती, पुरुष-स्त्री, लिंग-योनी यांचा संयोग हे सृष्टिनिर्मितीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच ‘अर्धनारीनटेश्वरा’स तसा प्रतीकात्मक अर्थ आहे. वेदांतही सोम व अग्नी यांना विश्वाचे माता-पिता कल्पिले आहे. अर्धनारी, अर्धनारीश, अर्धनारीश्वर इ. अर्धनारीनटेश्वराचीच पर्यायी नावे आहेत. इ.स.च्या सु. पहिल्या शतकापासून भारतात अर्धनारीनटेश्वराची अतिशय सुंदर शिल्पे कोरलेली आढळतात. वेरूळ व घारापुरी येथील त्याची शिल्पे प्रख्यात आहेत.
याच प्रमाणे परळी येथील कालराञी देवी च्या मुर्तीचे वैशिष्ट्ये असेच आहे. समोर दिसणारा मुखवटा (तांदळा)कालराञी देवीचा आहे आणी मुखवट्याचा पाठीमागचा अर्धाभाग लिंग स्वरूपाचा आहे. म्हणजे पाठीमागे शिवलिंग आहे.
कालराञी देवीस कालीमातेचे स्वरूपही मानले जाते. देवी भागवत पुराणानुसार माता पार्वती पासून या देवीची उत्पत्ती झाली असल्याचे सांगितले आहे. या देवीची आराधना करणार्या भक्तास अकाल मृत्यूचे भय रहात नाही, तसेच सर्व सिध्दींची अधिष्ठाञी कालराञी देवी आहे. त्यामुळे तीला शुभंकरी असेही संबोधले जाते.
मनुष्याचा संभ्रम नष्ट करणारी कालराञी देवी
मोह, संभ्रम अशा अवस्थांचा नाश करणारी कालराञी देवी!वेदांमध्ये हिचे एक राञिसूक्त आहे. बालकाच्या जन्मावेळी त्याच्या मुढ अवस्थेत त्याचे संरक्षण व्हावे म्हणून त्या बाळा जवळ बसून राञीसुक्ताचा पाठ केला जातो. पुर्वी महाकोसल देशाचा राजा विश्वपती यांच्या मुलास भ्रम झाला होता. तेव्हा त्यांनी परळी तिर्थक्षेत्री येऊन यथाविधी अनुष्ठान केल्यामुळे त्यांच्या मुलाचा भ्रम विकार नष्ट झाला.
विजया दशमीच्या दिवशी होतो मोठा उत्सव
नवराञी कालावधीत देशभरातून लाखो भाविक या देवीचीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. शहरातील शेकडो देवी भक्त या मंदिरात नऊ दिवस घटी बसतात. विजया दशमीच्या दिवशी या ठिकाणी मोठा दसरा महोत्सव पार पडतो. प्रभू वैद्यनाथांची पालखी कालराञी देवी स साडी ,चोळीचा आहेर घेऊन प्रभू वैद्यनाथ येतात.पालखी दाखल होताच या ठिकाणी वैद्यनाथ मंदिर ट्रस्ट च्या वतीने शोभेची दारू उडवण्यात येते. शहरातील सर्व नागरीक सिमोल्लंघन करण्यासाठी या ठिकाणी एकञ जमत असतात. एकमेकांना आपट्याची पाने देऊन सोनं लुटले जाते. नंतर कालराञी देवी ची आणि प्रभू वैद्यनाथ भगवान यांची पालखी बटूभैरव या ठिकाणी दाखल होऊन सिमोल्लंघन सोहळा पुर्ण होतो.
अशा या जागृत काल रात्री देवीची मनोभावे साधना करून आपणही आपल्या मायावी जगाच्या भ्रमातून स्वतः ला मुक्त करून घ्यावे.