पैठण : पैठण येथे शिंदे गटाचे मुख्यमंत्री यांच्या सभा झाली त्यावेळी भुमरे यांनी म्हटले होते हि सभा बघून अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.याला प्रतिउत्तर देत दानवे हे म्हणाले तुमच्याच पायाखालची वाळू सरकवून देऊ नका कारण पैठणची जनता वाळु काय सर्व काही पायासगट ओढणार असल्याचे विरोधी पक्षनेते दानवे हे पैठण शहरातील अभिनंदन कार्यालय येथे आयोजित केलेल्या नागरी सत्कार दरम्यान ते बोलत होते.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
पुढे बोलतांना दानवे हे म्हणाले की,ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी वाढीस निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे पत्र भुमरे हे शिवसेनेचे रोहयो मंत्री असतांना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी तातडीने वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली असतांना भुमरे आता शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करतातयि शिवसेना पक्षाने तुम्हाला भरपूर काही दिले या पक्षाच्या जीवावर निवडून आले.तरी म्हणता शिवसेना पक्षाने काय दिले.हे नमक हरामी याला पुन्हा येतो म्हणतात.पन्नास खोके एकदम ओके महाराष्ट्रातील लोकांनी या वाक्याची वाताहत केली.पुढे बोलतांना सांगितले आपल्या जिल्ह्यातील केंद्रात व राज्यात दोन दोन मंत्री असतांना पैठण तालुका अतिवृष्टीच्या यादीतून वगळण्यात आले.असेही यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांंचा आज दि.25सप्टेंबर रोजी भव्य नागरी सत्कार सोहळा पैठण तालुका शिवसेनेच्या वतीने पैठण शहरातील अभिनंदन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, तालुका प्रमुख मनोज पेरे,शुभम पिवळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता भाऊ गोर्डे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, विजय चव्हाण शहराध्यक्ष जितु परदेशी, कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष विनोद तांबे, अजय परळकर, चंद्रकांत झारगड,विकास गोर्डे, सोमनाथ जाधव,प्रकाश वानोळे, राजु परदेशी, राखी परदेशी, अशोक धर्मे अदिंची उपस्थिती होती