दोन वर्षांच्या संस्कारानंतर आता नवरात्रोत्सव थाटामाटात साजरा होणार आहे. नवरात्रोत्सव सुरू होण्यास काही तासांचा शिल्लक असतानाही भाविकांमध्ये उत्साह आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये देवीचा दरबार सजविण्याची तयारी सुरू झाली आहे. बडी खेरमाईमध्ये दोन वर्षांनंतर भव्य कार्यक्रमाबरोबरच जत्राही भरणार आहे. ज्यांच्या अंगणाची व्यवस्था केली जात आहे.
गणेशोत्सवानंतर आता रायगडकरांना वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. 26 सप्टेंबर2022 रोजी आदिशक्तीचे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये 1294 देवींच्या मूर्तीचे आगमन होणार असून 2294 घट बसविण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे 159 देवींच्या फोटोची स्थापना सुद्धा करण्यात येणार आहे.
त्यामध्ये सार्वजनिक मुर्त्या एक हजार 109 सार्वजनिक तर,185 खासगी देवींच्या मूर्तींचा समावेश आहे. नवरात्रोत्सवानिमित्त बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी होतआहे. आदिशक्तीच्या आगमनाच्या तयारीसाठी नवरात्रोत्सव मंडळांचीही चांगलीच लगबग सुरू असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव ज्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो, त्याच आपुलकीने आणि भक्तिभावाने आदिमायेचाजागर सलग नऊ दिवस घातलाजातो. आदिशक्तीचा हा उत्सव हा स्त्रीत्वाचा उत्सव असल्याने नवरात्रोत्सवात महिलांचाच दबदबा असल्याचे पाहायला मिळते. महिलांसाठी असणारा सण हा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. मोठ्या जल्लोषात सण साजरा करायचा म्हटला की, त्या सणासाठीची तयारीही तेवढीच उत्साहपूर्ण असली पाहिजे. यासाठी महिलावर्गाची तयारी सुरू आहे. नऊ दिवस भरणाऱ्या या उत्सवामध्ये गरबा, दांडिया मनमुरादपणे खेळला जातो.
त्यामुळे नऊ दिवसांचा ड्रेसअपही तसाच पाहिजे, तसेच त्यासाठी मॅचिंग ज्वेलरी, सँडल हे सुद्धा आलेच. या सर्वांच्या तयारीसाठी लागणारी खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारात गर्दी दिसून येत आहे.
सध्या महिला कॉन्ट्रास ड्रेसअप करण्याला पसंती देत असल्याचे दिसून येते. बाजारामध्ये असंख्य व्हेरायटीच्या साड्या, घागरा-चोली, लाचा, राजस्थानी पेहराव विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या दांडिया, ओढण्याही खरेदी करण्याची चांगलीच धूम आहे.हार-फुले, फळे, अगरबत्ती, धूप अशा पूजेच्या साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. घट स्थापनेसाठी लागणारी रंगबेरंगी मडकी, देवीचे मुखवटे यांनाही चांगली मागणी आहे.
26 सप्टेंबर2022 रोजी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आदिशक्तीची स्थापना करण्यात येणार आहे. दोन हजार 294घट स्थापन केले जाणार आहेत.त्यामध्ये दोन हजार 58 खासगी तर, 236 सार्वजनिक घटाचा समावेश आहे. नऊ दिवस अलिबाग तालुक्यातील काळंबा मंदिर,दक्षिणमुखी,शीतला देवी,महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये जत्रा भरणार आहे.
रायगड जिल्ह्यातील आसपासचे देवीचे भक्तगण येथे मोठ्या संख्येने भेट देतात. चौल येथील शितळादेवी मंदिर, कृष्णाई देवी,भगवती माता, हिंगळुजा देवी,मांडवा येथील टाकादेवी,नागाव येथील मूर्ती दक्षिणमुखी,मुरूड शहरातील कोटेश्वरी देवी,
देवीच्या मंदिर परिसरातही भाविकांची चांगलीच गर्दी होते. त्यामुळे मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणारआहे. दरम्यान, नवरात्रोत्सवअतिशय भक्तिमय आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करावायासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.
शारदीय नवरात्रोत्सवासाठी चौल-रेवदंडा परिसर सज्ज झाला असून, अनेक मंडळे मोठे मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई, नयनरम्य आरास, फुलांची सजावट, रांगोळीची नक्षी त्यात विराजमान होण्यासाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते तयारीत दिसत आहेत. साखरचौथचे गणपती विसर्जन झाल्यावर आबालवृद्धाचे लक्ष शारदीय नवरात्र उत्सवाकडे लागलेले असते. ती प्रतीक्षा संपून आता हवा असणाऱ्या शारदीय उत्सवाचा दिवस आल्याने देवीच्या स्वागतात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सज्ज दिसत आहेत. सोमवार पासून परिसर गजबजणार असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. विसर्जन मिरवणुकादरम्यान, नवरात्रोत्सवांती 4 ते 9 ऑक्टोबर या दरम्यान जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये 5 आॅक्टोबर रोजी 714 सार्वजनिक, तर 346 खासगी देवी मूर्तींच्या मिरवणुका आहेत. 6आॅक्टोबर रोजी 401 सार्वजनिक, तर 44 खासगी, 7 आॅक्टोबर रोजी 14 सार्वजनिक आणि 8 आॅक्टोबर रोजी एक तर 9 ऑक्टोबर रोजी तीन सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका होणार आहेत.
दोन दिवसांत आदिशक्तीचे आगमन होणार असल्याने नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या असून, खरेदीसाठी नागरिकांची लगबगही सुरू झाली आहे.
दहा दिवसांच्या नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याकरिता नियमित पोलीस बंदोबस्तासह जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक /पोलीस उप निरीक्षक 98,स्थानिक पोलिस स्टेशन स्तरावर आठशे कर्मचारी, जिल्ह्यात ३०० पुरु ष व १०० महिला होमगार्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत.त्याच्याबरोबर त्यांच्या सोबतीला
आरसीपी प्लाटून, दोन एसआरपी प्लाटून ,क्यूआरटी प्लाटून,आठ स्ट्रेकिंग फोर्स सज्ज करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली.