मृतांमध्ये आरोग्य सेवक, उपसरपंचाचा समावेश आहे 

आष्टी ( प्रतिनिधी ) नवराञ उत्सव उद्यापासून सुरू होत असून, प्रत्येक गावातून युवक तुळजापूर, माहूरगड, मोहटादेवी याठिकाणी जाऊन ज्योत आणत आहेत.आष्टी तालुक्यातील पाटणसांगणी येथील तरूण ज्योत आणण्यासाठी तुळजापूर येथे जात असतांना येरमाळा जवळ मोटार सायकलवर असलेल्या दोन तरूणांचे अपघाती निधन झाले . अमोल सुरेशराव खिलारे उपसरपंच (वय 38) व महेश भास्करराव भोसले आरोग्य सेवक (वय 31) असे या मयत तरूणांचे नाव आहे.

गेल्या दहा वर्षापासून ज्योत आणण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून,प्रत्येक गावातील तरूण ज्योत आणण्यासाठी आप-आपल्या गावातील मंडळ एकञ येत घटस्थापनेच्या आगोदर तुळजापूर, मोहटादेवी, माहूरगड आशा देवींचे असलेले ठाणे तिथून ज्योत आणून घटस्थापना करतात.दि.24 शनिवारी आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील युवक मंडळ तुळजापूर येथे ज्योत आणण्यासाठी निघाले.पहाटे तीन च्या दरम्यान येरमाळा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर अमोल खिलारे व महेश भोसले गाडीच्या पाठीमागे आपल्या मोटारसायकलवर चालले होते.त्यांच्या मोटार सायकलला अपघात होऊन खिलारे अन् भोसले जागीच मृत पावले. त्यांच्या निधनाने सांगवी पाटण या गावावर दुखा;चा डोंगर कोसळला आहे.मयतांवर रविवार रोजी सकाळी 9 वा.सांगवी पाटण येथे अत्यंसंस्कार करण्यात येतील.