कन्नड : सध्या पशूंमध्ये लम्पी स्कीन व्हायरस मोठ्या प्रमाणात वाढत आहे . याची लागण झाल्यास पशू मरण्याचा धोका असतो . लम्पी आजाराने तालुक्यात पाय पसरायला सुरुवात झालेली असून या आजाराशी सामना करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडे औषधींचा तुटवडा असल्याचा निदर्शनास येत आहे . दरम्यान लम्पी रोगाविषयी देवगाव गावोगावी जनजागृती आहेत . जाऊन याबद्दल कार्यक्रम घेण्यात येत या आजाराबद्दल माहिती देण्यात येत आहे . जनावरांच्या गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणारे सोडियम हायप्लोक्लाराइड व गोचीड गोमाशीच्या नियंत्रणासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे पत्र जिल्हा परिषदेला - पाठवूनही अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत . याच्यावर ग्रामसेवकांना पत्रव्यवहार करूनसुद्धा याबाबत कारवाई झालेली नाही . तालुक्यामध्ये वर्ग- १ दवाखाने देवगाव रंगारी , चिंचोली , औराळा , पिशोर , नाचनवेल , जैतखेडा , चिकलठाण , नागद येथे आहेत . यात नागद , जैतखेडा , चिकलठाण , औराळा या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या . कन्नड तालुक्यातील रंगारी परिसरात जागा रिक्त आहेत . आतापर्यंत देवगाव रंगारी विभागातील लम्पी आजाराच्या जनजागृती कार्यक्रमांतर्गत चांभारवाडी , विटखेडा , कानडगाव , देवळी , ताडपिंपळगाव , लामनगाव , शेवता , देवपुडी , धारणखेडा येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला . लम्पी रोग नियंत्रणासाठी मंत्रालयात समन्वयक कक्ष स्थापन . संपर्कासाठी समन्वय कक्षाचा ०२२-२२८४५१३२ हा क्रमांक देण्यात आला . लम्पी आजाराची २७ जनावरे आढळली कन्नड तालुक्यामध्ये आतापर्यंत २७ लम्पी आजाराची जनावरे आढळली . त्यात प्रामुख्याने कन्नड़ , रेल , अंधानेर , नाचनवेल , शिवराई , बनशेंद्रा या ठिकाणी आजारी जनावरे आढळली आहेत . तालुक्यात १६ सप्टेंबरपर्यंत १२०० लसीकरण पूर्ण झाले आहे . नीम तेल , करंज तेलाची फवारणी करा शेतकरी बांधवांनी गोंधळून जाऊ नये याबाबत आपल्या गोठ्यांची नीम तेल , करंज तेल आणि साबण याचे द्रावण करून फवारणी करावी , अशी माहिती देवगाव रंगारीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . विजय थोरात यांनी दिली .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कल लॉन्च होगा Citroen C3 Aircross का ऑटोमैटिक वेरिएंट, जानिए किन खूबियों के साथ होगी एंट्री
कॉम्पैक्ट एसयूवी के आउटपुट में वृद्धि देखने की उम्मीद है। क्योंकि कंपनी इस गाड़ी को एक नए वेरिएंट...
जागतिक आर्थिक परिषदेत आज ग्रीन हायड्रोजनचा धोरणाला बळकटी
दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत आज महाराष्ट्राच्या ग्रीन हायड्रोजनच्या धोरणाला...
PM Modi On Israel-Gaza Conflict: इजराइल में आतंकी हमलों की खबर से गहरा सदमा लगा- PM Modi | Aaj Tak
PM Modi On Israel-Gaza Conflict: इजराइल में आतंकी हमलों की खबर से गहरा सदमा लगा- PM Modi | Aaj Tak
સીમર ગામે આમ આદમી પાર્ટી માં 50લોકો જોડાયા
સીમર ગામે આમ આદમી પાર્ટી માં 50લોકો જોડાયા
कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथील भौतिक सुविधा आणि विस्तारीकरण या संदर्भामध्ये महानगरपालिका प्रशासनाची स्मशानभूमीला भेट
कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथील भौतिक सुविधा व विस्तारीकरण संदर्भामध्ये महानगरपालिका...