ॲड. सुभाष राऊत यांच्या माध्यमातून मिळाली सत्यशोधक समाजाला नवी ऊर्जा - माजी आ. नारायणराव मुंडे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
बीड / प्रतिनिधी
समाजात असलेला जातीय भेदाभेद आणि विषमता दूर करण्यासाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आज या स्थापना दिवसाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्तीकोत्तर स्थापना दिना निमित्त ॲड. सुभाष राऊत यांनी गेल्या अनेक दशकांपासून कार्य करीत असलेल्या सत्यशोधक समाजाच्या प्रचारकांचा सत्कार करून त्यांना नवी स्फूर्ती दिली असल्याचे प्रतिपादन माजी आ. नारायणराव मुंडे यांनी केले आहे.
समाजात असलेला जातीय भेदाभेद, विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा स्थापना केली. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. सत्यशोधक समाजाची स्थापन करून त्यांनी प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. या सत्यशोधक समाजाला आज दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. या समाजाचे विचार आजच्या काळातही अतिशय महत्वाचे असून ते समाजात रुजविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्यशोधक समाजासाठी वाहिले अशा मान्यवरांचा गौरव सोहळा करण्याची संकल्पना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 11: 30 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे
संपन्न झाला