वटकळी येथे गोठ्याला आग शेती उपयोगी साहित्य जळून खाक
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील वटकळी या ठिकाणी आज दिनांक 24 सप्टेंबर वार शनिवारी रोजी च्या सायंकाळच्या सुमारास गोठ्याला आग लागून एक गाय व वासरू मृत्युमुखी पडले असून यामध्ये शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली असून सदरील आगीमध्ये शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाल्याची घटना घडली सदरील घटनेचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी विठ्ठलराव रामचंद्र शिंदे वटकळीकर यांनी केली आहे