बीड - महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना सीटू चा वीस ते बावीस वर्षांचा सतत संघर्ष, संप, मोर्चा, आंदोलन, जेल, निवेदन व कामगार नेते डॉ.डी.एल.कराड, दत्ता डाके, मोहन जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ निर्माण झाले आहे. महामंडळाच्या माध्यमातून कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.

राज्यासह बीड जिल्ह्यात महामंडळाच्या माध्यमातून एक महिन्या पासून ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरू आहे. नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळत आहेत. तरी सर्व ऊसतोड कामगार, वाहन मालक, मुकादम, ग्रुप लीडर यांनी स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन नोंदणी करावी व ओळखपत्र घ्यावे. असे आवाहन महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या (सीटू) वतीने दत्ता डाके, मोहन जाधव, पांडुरंग राठोड, अशोक राठोड, सुदाम शिंदे, मनिषा करपे, ओम पुरी, बळीराम भुंबे, मधुकर आडागळे, विजय राठोड, बालासाहेब चोले, अनिल राठोड, अंगद खरात, बंडू राठोड, तुळशीराम आवाड, जगन्नाथ जाधव, रामराजे गवाने, राजू ईबीते, ज्ञानेश्वर जाधव, विनायक चव्हाण, विनायक राठोड, रामराव राठोड, संतोष जाधव, अंकुश जाधव, सुहास जायभाये, सुभाष राठोड, रवी राठोड, गोपीकिसन चव्हाण, राहुल राठोड, राजू राठोड, भारत राठोड, गणेश राठोड यांनी केले आहे.