आज विरेगाव ग्रामपंचायत कार्यालय परीसरात महादेव मंदिर सभागृहात दिनांक 24 /09/ 2022 शनिवार रोजी मोफत हेल्थ कॅम्प आयोजित केला होता
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत कारवा हॉस्पिटल यांनी
कारवा हॉस्पिटलचे डॉ अनिकेत करवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे डिस्ट्रिक्ट हेड डॉ किशोर चेपटे कारवा हॉस्पिटलचे डीईओ गौरव भावले यांच्या नेतृत्वाखाली तसेच सरपंच अमोलभैय्या जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
शिबिरामध्ये 243 महिला पूरूषाची मोफत तपासणी करून पेशंटला औषधी पण मोफत देण्यात आल्या तसेच आठ दहा प्रमुख आजारांवर मोफत शस्त्रक्रिया किंवा पूर्ण निदान मोफत होईल थोडक्यात शासकिय योजनांची अंमलबजावणी केली आहे तसेच डॉ किशोर चेपटे /ड्रिस्टीक हेड/ यांनी जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थी शिक्षक अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांना आरोग्याविषयी शासकिय योजनेची माहिती सांगितली जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्हा सर्वांना पटवून सांगितले आणि हि माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचा असे संबोधीत केले आहे एकंदरित छान शिबिराचे आयोजन झाले या कार्यक्रमात सहभागी उपस्थित ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद शाळा शिक्षक स्टाप या सर्वांनीच मदत केली आहे असे सरपंच अमोलभैय्या जाधव यांनी सांगितले आहे