सोलापूर - महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील सर्व मिळकतकरांना आवाहन करण्यात येत आहे. की ज्याच्याकडे स्वतःच्या इलेक्ट्रिक वाहनाकरिता चार्जिंग स्टेशन उभारल्यास व त्यातून इतर इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास आपल्या मालमत्ता करामध्ये दोन टक्के सूट देण्यात येत आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थेमधील 20% घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास मालमत्ता करामध्ये एक टक्के सूट देण्यात येत आहे व 40% घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास मालमत्ता करामध्ये 2%टक्के सूट देण्यात येत आहे.
गृहनिर्माण संस्थेमधील 60% घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास मालमत्ता करामध्ये 3% सूट देण्यात येत आहे. गृहनिर्माण संस्थेमधील 80 टक्के घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास मालमत्ता करात 4% सूट देण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्थेमधील 100% टक्के घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास त्या ठिकाणी 5% टक्के सूट देण्यात येणार आहे. सवलतीचा शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा तसेच ज्यांनी सवलतीसाठी अर्ज केला आहे. अशा घरांची माहिती त्या भागातील मालमत्ता कर अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून घेतले जाईल व त्यानुसार त्यांना लाभ देण्यात येईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांनी दिली.