सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाअध्यक्षपदी बार्शीच्या सुवर्णा शिवपुरे तर महिला जिल्हा कार्याध्यक्ष पदी मार्डीच्या सुवर्णा झाडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण या नुकत्याच सोलापूर दौऱ्यावर येऊन गेल्या त्यांनी शासकीय विश्रामगृहावर शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी विविध पदांची नियुक्ती केली त्यामध्ये नूतन जिल्हाध्यक्ष व नूतन जिल्हा कार्याध्यक्ष पदाच्या निवडी झाले आहेत.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे कडून निवडीचे पत्र पश्चिम विभागीय अध्यक्ष कविता म्हेत्रे आणि जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या निवडी मुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसला एक प्रकारे सुवर्ण झळाळी मिळाल्याचं चित्र असून निश्चितच ग्रामीण भागात महिलांचे संघटन बळकट करून राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणे पोचवून पक्ष व संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे झाडे आणि शिवपुरे यांनी सांगितले.