गुजरात राज्यामधील गांधीनगर येथे २२ सप्टेंबर रोजी पार पडली आंतरराष्ट्रीय फॅशन शो स्पर्धा

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बीड (प्रतिनिधी):- वर्ल्ड डिझाईनिंग फोरम के.डी.सी.आय यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शो स्पर्धेत तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड येथील विद्यार्थिनी अर्चना अशोक साळवे यांना इंडियन डिझाईन एक्सलंट अवॉर्ड मिळाला आहे.त्यांनी या फॅशन शो स्पर्धेत हे पारितोषिक पटकावून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.यानिमित्त पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन ने यशाची पताका रोवली आहे. 

२२ सप्टेंबर रोजी गुजरात राज्यातील गांधीनगर येथे सदरील आंतरराष्ट्रीय फॅशन शो स्पर्धा पार पडली.

एस्टॅब्लिश डिझायनर अँड कन्सेप्ट डिझाईन या विषयावर वर अर्चना साळवे यांनी खादी पासून तयार केलेली रेडी टू वियर साडी तयार केली.खादी गारमेंट पासून तयार करण्यात आलेल्या नऊवार साडी मध्ये ब्लॉक प्रिंटिंग सह नैसर्गिक कलर चा वापर अर्चना साळवे यांनी केला होता.या स्पर्धेसाठी विविध राज्यातून डिझायनर आणि फॅशन डिझाईन कॉलेजमधील विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला होता.

तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड येथे एम डिझाईन मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी अर्चना साळवे यांनी या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावून पुन्हा एकदा बीडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकविले आहे. या स्पर्धेसाठी वर्ल्ड डिझाईन फोरम आणि केडीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश अनामी,फाउंडर ऑफ रुबिका काउंटर एबीएस मेंबर ऑफ ब्रिटिश कौन्सिलच्या डिझायनर रूबिका डिसूजा, एफ.डी.डी.आय फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर सिद्धेश कुमार, परुल युनिव्हर्सिटीच्या व्हॉइस प्रिन्सिपल पलक पटेल, सेलिब्रिटी डिझायनर सीमा कलावडिया यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते अर्चना साळवे यांना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेसाठी देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांचे प्रोत्साहन आणि प्राचार्य अश्विनी बेद्रे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे अर्चना साळवे यांनी सांगितले आहे.