हिंगोली प्रतिनिधी /गोपाल सातपुते
वसमत, :-रेल्वेस्टेशन येथे खतांचा रेल्वे रॅक पॉईंटचा शुभारंभ संपन्न झाला. खतांचे रेल्वे रॅक पॉईंट हे हिंगोली येथे उपलब्ध होते, त्यामुळे वसमत तालुक्याला लागणारे खत हे हिंगोली येथून आणावे लागत असे, आता खतांचा रेल्वे रॅक पॉइंट वसमत येथे नव्याने निर्माण केल्यामुळे वसमत तालुक्याला खतांचा तुटवडा जाणवणार नाही. तसेच या पॉइंट मुळे उद्योगांना चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा न जाणवता त्यांना खत उपलब्ध होईल.
आज वसमत येथे या पॉईंटला खतांची पहिली रॅक दाखल झाली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या रॅकचा शुभारंभ करण्यात आला.