मालेगाव तालुक्यात मागील वर्षी ऑक्टोबर 2021 मध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये जउळका व किनीराजा मंडळातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते परंतु शासनाकडून अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली या दोन्ही मंडळातील मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज वाशिम जिल्हा दौऱ्या निमित्त आले असता यांना मालेगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष सुरेश मुंडे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे

मागील वर्षी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामध्ये सर्वात जास्त किनीराजा व जउळका सर्कलमधील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला त्यामध्ये बळीराजा हतबल झाला होता शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असतानाही अद्याप पर्यंत शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही तरी त्वरित कार्यवाही करून जउळका व कीनिराजा मंडळातील मागील वर्षे ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी आज 23 सप्टेंबरला मालेगाव येथील नियोजित कार्यक्रमात कृषी मंत्री अब्दुल सत्तार आले असता भाजपाचे मालेगाव तालुका अध्यक्ष सुरेश मुंडे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.