पालम प्रतिनिधी

पालम ते राणीसावरगाव हा राज्य रस्ता क्रमांक 249 अंदाजपत्रकानुसार D R P NO.24 क्रमांक सर्वेक्षण होऊन आज पर्यंत या कामाप्रती कोणतेही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे पालम ते राणीसावरगाव रोड लगतचे सर्व गावकरी, शेतकरी शेतमजूर लोकप्रतिनिधी , सर्व नागरिक यांच्यात असंतोष निर्माण झाल्यामुळे दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पालम तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले या रस्त्यावरील प्रत्येक गावातील तरुण व शेतमजूर मोठ्या बहुसंख्येने यावेळी उपस्थित होता या रस्त्यावर वाहतूक करत असताना मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढत जात होते त्यामुळे या कारणास्तव या रस्त्यावरील सर्व नागरिकांनी उपोषण घडवून शासन प्रशासनावर दबाव आणून आपल्या मूलभूत प्रश्नांना हात घालण्यासाठी प्रयत्न केला यावेळी सर्व तरुण रस्त्यावर एकत्र जमून तहसील मधील प्रांगणात एक दिवसीय साखळी उपोषणास बसले या उपोषणास या रस्त्यावरील सर्वच गावचे लोकप्रतिनिधी हजर होते त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजयकुमार शिंदे, पालम तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष कृष्णा भाऊसाहेब भोसले खोरस येथील ग्रामपंचायतचे सरपंच खंडागळे , अमोल खंडागळे, राम महाराज, मदनेश्वर सुरनर , मोतीराम खंडागळे, शिवाजी खंडागळे माधव गिरी तेलजापूर येथील सरपंच हनुमंतराव मोगरे, अशोक घाडगे ज्ञानेश्वर कदम, राम कदम शिवा पस्तापुरे , गजानन पस्तापुरे, किरण पवार रामा सुरनर, यांच्यासह यावेळी, पोखरणी देवी येथील सरपंच दीपक पवार यांच्यासह आदी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या ऊपोषणास पाठिंबा म्हणून गणेश राव रोकडे , यांनी यावेळी मार्गदर्शन केले व उपोषणास पाठिंबा दर्शविला त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे सखारामजी बोबडे , रामेश्वर भोसले, दिगंबर भोसले यांनी यावेळी उपोषणास पाठिंबा दर्शवला यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णा भोसले यांनी पालम ते राणी सावरगाव या रस्त्याबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व शेतमजूर मजुरांना होत असलेला त्रास याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या व सदरील रस्ता हा तात्काळ नाही झाला तर यानंतरही आपण पुढचे ठोस पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे धापसे साहेब , यावेळी उपस्थित होते पालम तहसीलचे नायब तहसीलदार घनसावंत साहेब यांच्या मध्यस्थीने उपोषण थांबवण्यात आले