जिंतूर तालूक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री गणेश गांजरे यांनी आपला वाढदिवस कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामधील विद्यार्थीनी सोबत साजरा केला व एक वेगळा आदर्श निर्माण केला आपल्या वाढदिवसानिमित्ताने या विद्यालयास शैक्षणिक उपयोगी साहित्य म्हणून 4 फुट बाय 6 फुट चे 5 ग्रीन बोर्ड भेट दिले . मागील 4 वर्षांपासून शाळेला बोर्डाची आवश्यकता होती.

या शाळेमध्ये शाळाबाह्य तसेच गरजू व गरीब विद्यार्थीनी शिक्षण घेत असतात गांजरे साहेबांनी आपल्या वाढदिवसासाठी होणार खर्च कमी करुन या होतकरू विद्यार्थीनीच्या शिक्षणासाठी शैक्षणिक उपयोगी साठी भेट देऊन समाजासमोर एक नविन आदर्श निर्माण केलाय