कन्नड : तालुक्यातील नाचनवेल येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कन्नड दोन अंतर्गत अंगणवाडी क्रमांक ३ व ४ मध्ये राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२२ मध्ये स्वस्त बालक स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत तीन बालकाची गुणानुक्रमे निवड केली . एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचवा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात आला . सप्टेंबरनंतर या स्पर्धेचे आयोजन दर तीन महिन्यांनी करायचे असल्याचे येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका मंदा नागरे यांनी यावेळी सांगितले . यावेळी प्रथम , द्वितीय आणि तृतीय आलेल्या बालकांचा उपस्थित महिलांच्या हस्ते वही , पेन , पेन्सिल देऊन गौरव केला . प्रसंगी अंगणवाडी सेविका तारा रोठे ( सुरडकर ) , मनीषा चौंधे ( थोरात ) , मदतनीस मंगल आराक यांच्यासह माता पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती