शिवछत्रपती महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

पाचोड प्रतिनिधी/

पाचोड ता.पैठण येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये मराठी विभाग आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रा.सुभाष पोटभरे हे होते. माजी प्राचार्य डॉ.सुरेश यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये प्रा. डॉ. संतोष चव्हाण यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून अण्णांचे साहित्य, त्यांचे जीवनमान आणि त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला तसेच स्मशानातील सोनं ही कथा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले.

प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. सुभाष पोटभरे यांनी आपल्या भाषणामध्ये साम्यवाद, मार्क्सवाद, अण्णाभाऊंचे विचार 'पृथ्वीही शेषाच्या मस्तकावर नसून ती गोर गरीब कष्टकरी मजूर यांच्या तळहातावर तरलेली आहे' असे प्रतिपादन त्यांनी केले.अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे विचार, ग्रामीण भागातील अण्णाभाऊंनी लिहिलेले साहित्य, त्याचा वास्तवाशी संबंध त्याचबरोबर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्वातंत्र प्रति असलेले योगदान, स्पष्टता व प्रखडपणा हे टिळकांचे गुण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी डॉ. ह.सो. बिडवे प्रा. विलास महाजन प्रा. सचिन कदम अनिल नरवडे डॉ. भगवान जायभाये प्रा. संदीप सातोनकर डॉ. उत्तम जाधव डॉ.गांधी बाणायत प्रा. हेमंत कुमार जैन,उमाकांत भोसले, वैभव राऊत, प्रतीक देशमुख यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनोद कांबळे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. शिवाजी यादव यांनी मानले.