हळद मार्केटमध्ये हळदीची आठ हजार पोत्याची आवक; वाहनांच्या रांगा लागल्या पोस्ट ऑफिस पर्यंत

हिंगोली येथील हळद मार्केटमध्ये आज 23 सप्टेंबर शुक्रवारी रात्रीपासूनच वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत या रांगा हिंगोली शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयापर्यंत रांगा लागल्या असून जवळपास आठ हजार क्विंटल हळद मार्केटमध्ये दाखल झाली आहे सध्या परिस्थिती हळदीला सहा हजार ते सात हजार दरम्यान भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपला घरात साठवून ठेवलेला माल मार्केटमध्ये विक्रीसाठी काढत आहे तर सध्या परिस्थितीला हळदीला सहा हजार ते सात हजार रुपये भाव दिला जात आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती हळद मार्केट यांच्याकडून प्राप्त झाली आहे.