कन्नड : आपल्या पूर्वजना नैवेद्य देऊन तृप्त करण्याचा हिंदू संस्कृतीतील अतिशय महत्वाचा काळ म्हणजे पितृपक्ष आहे . या पंधरवड्यात एक दिवस तिथीनुसार आपल्या पूर्वज असणान्या पितरांना किमान अकरा भाज्या , गोड खीर , चपाती असा नैवेद्य देण्याची प्रथा आहे . या दिवशी प्रत्येक कुटुंब भाज्या कितीही महाग असल्यातरी खरेदी करतो पितृ तर्पण करत असतो . काही दिवसापासून अचानक पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतातील उभा हिरवागार भाजीपाला सतत चालणाऱ्या रिमझिम पावसामुळे खराब झाला . त्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा आला असतांना पितृपक्ष आल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे . त्यामुळे भाजीपाला महागला असून सर्व सामान्य माणसांना खरेदी करतांना खिशाला परवडत नाही . मेथी , भेंडी , कारले , डांगर , बटाटे, गवार , या भाज्या पितृ तर्पण करावयाच्या नैवेद्य देतांना हमखास वापरतात . या भाज्या कितीही महाग झाल्या तरी खरेदी कराव्या लागतात , किंवा कुठेही मिळाल्या तरी त्या खरेदीला जावे लागते . त्यामुळे या भाज्यांना सध्या बाजारात प्रचंड मागणी आहे . मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने तुटवडा जाणवत आहे त्याचा परिणाम बाजार भावावर झाला असून नागरिकांना चढ्या दराने खरेदी कराव्या लागत आहे . अलीकडे काही दिवसापासून रिमझिम पावसामुळे मालाची आवक घटली सतत चालणाऱ्या रिमझिम पावसामुळे मालाच्या आवकमध्ये फार परिणाम पाहावयास मिळत आहे . कोथिंबीर आणि मेथीची भाजी सर्वात जास्त तेजीत आहे जोरात पाऊस पडत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे भाजीपाला शेतात सडून गेल्याने अनेक ठिकाणी पुरेसा पुरवठा होत नाही . त्यामुळे आवक घटली असून त्याचाही परिणाम भाजीपाला बाजार भावात वाढण्यावर झाला आहे . आज कोणतीही भाजी बाजारात घ्यायला गेले की किमान वीस रुपये पाव किलो दराने मिळते , मेथी २५ ते ३० रुपये एक जुडी असल्यामुळे सामान्य नागरिकांना न परवडणारी आहे . तरीही पितृपक्ष असल्यामुळे त्या खरेदी कराव्या लागत आहे . सामान्य कुटुंबाच्या नागरिकांच्या खिशाला न पडवणारे आहे