शिवसेना(शिंदे गट) उत्तर जिल्हा महिला संघटकपदी शुभांगी करडे यांची नियुक्ती
शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या तथा मुंबई महानगरपलिकेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर रायगड महिला संघटिका पदी मुरूड येथील शुभांगी राजन करडे यांची नियुक्ती केली आहे.
शुभांगी करडे यांनी मुरूड तालुक्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केलेले आहे. मागील नगरपालिका निवडणूक तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मधून मुरूड तालुक्याला मोठ्या प्रमाणात यश मिळवून देत सेनेचे सदस्य निवडून आणले होते. शुभांगी करडे म्हणजे मुरूड तालुक्यातील सेनेची जखमी वाघीण अशी ओळख आहे.शुभंगी करडे यांनी एकनाथ शिंदे,आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यावर विश्वास ठेवत त्यांनी सुरवातीपासून पाठिंबा दिला आहे.त्याची दखल घेत त्यांना जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे
शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या तथा मुंबई महानगरपलिकेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे,मंत्री दादा भुसे,आमदार महेंद्र दळवी,आमदार भरत गोगावले,आणि महेंद्र थोरवे,उत्तर रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी,मुरूड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर,जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी यांच्यासाहित अनेकांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.