सोलापूर :- डबघाईला आलेल्या आणि तोट्यात असलेल्या सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमांकडील आतापर्यंत तब्बल 21 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता कामचुकार व गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
“आमदनी अठन्नी और खर्चा रुपय्या !” अशा परिस्थितीत अडकलेल्या सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाने गेल्या दोन वर्षात कामचुकार, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत दीर्घकाळ गैरहजर असणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.