महिला महाविद्यालयात 'हिंदी सप्ताह' चा समारोप संपन्न

गेवराई दि. २२ (प्रतिनिधि) रोजगार मिळवण्यासाठी विद्यार्थीनींनी मातृभाषा सह हिंदी भाषा आत्मसात करावी. असे प्रतिपादन श्री. सतिष कांयदे यांनी केले. ते जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय, गेवराई येथे 'हिंदी विभाग' द्वारा आयोजित 'हिंदी सप्ताह समारोह' च्या समारोप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. कांचन परळीकर, विभागाध्यक्ष प्रा. डॉ. संगिता आहेर व प्रा. रामहरी काकडे यांची उपस्थिति होती.

हिंदी विभागाच्या वतीने आयोजित 'हिंदी सप्ताह' कार्यक्रमाचा समारोप आज संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बँक आँफ महाराष्ट्र गढी चे श्री. सतिष कायंदे हे उपस्थित होते. ते म्हणाले की, हिंदी ही रोजगारपरक भाषा आहे. रोजगार प्राप्त करण्यासाठी विद्यार्थीनींनी मातृभाषा सह हिंदी व इंग्रजी वर प्रभुत्व प्राप्त करणे आवश्यक आहे. बँकींग क्षेत्रामध्ये ही हिंदी चाच सर्वाधिक वापर केला जातो. अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर म्हणाल्या की, हिंदी ही राजभाषा असून देशात सर्वाधिक बोलली व समजली जाणारी भाषा आहे. संपर्क भाषा व राष्ट्रीय एकता राखण्यासाठी ही हिंदी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. 

यावेळी विद्यार्थीनींनी बनवलेल्या 'दर्पण' या भित्तिपत्रकाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. हिंदी सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थीनींना अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलम. 

या कार्यक्रमाचे संचलन शेख सुमेरा हीने केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. संगिता आहेर यांनी तर आभार प्रा. रामहरी काकडे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.