पूर्णा (ग्रामीण प्रतिनिधी)ताडकळसपासून जवळच असलेल्या देऊळगाव दुधाटे येथील स्मशानभूमीला व जिल्हा परिषद शाळेला अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी (दि.21) रोजी सदिच्छा भेट दिली. शाळेच्या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत अशी नाविन्यपूर्ण शाळा कमी प्रमाणात माझ्या बघण्यात आल्या असे त्यांनी गावकऱ्यांच्या समोर बोलून दाखवले. प्रत्येक वर्गात प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक वर्गातील रंगरंगोटी, लाईट-फिटिंगचे काम व भौतिक सुविधा काम पाहून समाधान व्यक्त केले. शाळेतील वृक्षारोपण, हॅन्डवाॅश स्टेशन, डायनिंग हॉल, पाणी फिल्टर रूम, क्रीडांगण पाहून आनंद व्यक्त केला. एवढ्या चांगल्या शाळेला संगणक शासनातर्फे उपलब्ध झाले नाही, तर स्वतःच्या खिशातून पैसे घालून संगणक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी शाळेला दिले. अतिशय सुंदर भाषेत शाळेतील विद्यार्थिनी कु.स्नेहा दुधाटे हिने शाळेत झालेल्या सर्व उपक्रमाविषयी व गुणवत्तेविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाळेचे मुख्याध्यापक बी. आर.कदम व शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना काय हवे याची विचारपूस करून विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. गावकरी मंडळींनी शाळेला दिलेल्या पाच लाखापेक्षाही जास्त लोकवर्गणीसाठी तसेच गावकरी मंडळी शाळेला करीत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले.

 एकंदरीत प्रत्येक गावात स्वच्छ आणि सुंदर धार्मिक स्थळे असतात परंतु माणसाचा शेवट जिथे होतो तेथे स्मशानभूमीची दयनीय अवस्था पहायला मिळत आहे. पण तुम्ही गावकऱ्यांनी एक गाव एक स्मशानभूमीच्या उपक्रमातून चांगल्या प्रकारे समजून उभा करण्याचे कार्य हाती घेतल्यामुळे गावकरी मंडळींचे भरभरून कौतुक केले. यावेळी गावचे सरपंच उत्तमराव कांबळे, दीनानाथ दुधाटे,माजी उपसरपंच भगवानराव दुधाटे, शमाणिकराव दुधाटे, स्मृती उद्यानाचे संकल्पक गोविंदराव दुधाटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रंगनाथ दादा दुधाटे, ग्रामसेवक पोटे, प्रगतशील शेतकरी मोतीराम दुधाटे, नामदेव दुधाटे, बळीराम काका दुधाटे, सुदाम आबा दुधाटे, पंढरीनाथ शिंदे, गोदावरी विद्यालयाचे सचिव भगवानन नाना दुधाटे, भास्कर सोनकांबळे, ग्रामपंचायत सदस्य श्री उद्धव दुधाटे, श्री उद्धव दुधाटे, श्री उद्धव दादा दुधाटे,श्री रामेश्वर बापू दुधाटे, सचिन जोगदंड, पांडुरंग दुधाटे, श्री माधव टोपाजी, श्री काशिनाथ दुधाटे, श्री प्रकाश नाना दुधाटे, महादेव पांचाळ जी अण्णासाहेब दुधाटे तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.