परभणी(प्रतिनिधी)भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यग्र असतो, मात्र खूप कमी लोकांना हे माहित आहे की त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या वेळ काढून लोकांच्या पत्रांना उत्तर देतात. शालेय विद्यार्थ्यांमध्येदेखील ते लोकप्रिय आहेत. मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नेहमी विद्यार्थ्यांशी परीक्षा, अभ्यास, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी विषयांवर संवाद साधतात. पंतप्रधान मोदींचे एक पत्र महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे राहणाऱ्या अवघ्या एक वर्षे वयाच्या ओजस्वी गोपाळ मंत्री या चिमुकलीला मिळाले आहे. 'ओजस्वी' च्या वाढदिवसानिमित्त थेट पंतप्रधानांकडून शुभेच्छा मिळाल्याने मंत्री कुटुंबाच्या आनंदाला पारावारच उरला नाही. गंगाखेड शहरातील व्यंकटेश नगर येथे राहणारे तथा सरस्वती विद्यालयातील सहशिक्षक गोपाळ मंत्री व त्यांची पत्नी अभिलाषा यांची कन्या कु. ओजस्वी हिचा प्रथम वाढदिवस दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाला. देशाचे स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सुद्धा 17 सप्टेंबर रोजी होता. या अनुषंगाने गोपाळ मंत्री यांनी पंतप्रधान कार्यालयाशी थेट संपर्क साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून प्रत्यक्ष आशीर्वाद देण्याविषयी विनंती केली होती. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव ती नाकारण्यात आली. परंतु एका सामान्य नागरिकाच्या एका साध्या विनंतीची दखल स्वतः देशाचे पंतप्रधान यांनी घेऊन आपला वैयक्तिक शुभेच्छा संदेश स्पीड पोस्ट च्या माध्यमातून मंत्री परिवाराला पाठवला. या पत्राची संपूर्ण शहरात चांगलीच चर्चा ऐकावयास मिळाली. कारण परभणी जिल्ह्यात प्रथमच एखाद्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त थेट देशाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा मिळणे ही निश्चितच सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Pune Murder Case | धक्कादायक! पुण्यात 24 तासांत तीन खून | zee24taas
Pune Murder Case | धक्कादायक! पुण्यात 24 तासांत तीन खून | zee24taas
টম টমত উঠি চিকিৎসালয়লৈ এটি গৰু পোৱালী : দুই যুৱকৰ প্ৰশাসনীয় পদক্ষেপ
টম টমত উঠি চিকিৎসালয়লৈ গৰু পোৱালী
মাজুলীৰ পৰা দুজন যুৱক গৈছিল ধকোৱাখানালৈ
ঢ়কুৱাখানা...
ড্ৰাগছ সৰবৰাহকাৰীলৈ আৰক্ষীৰ গুলি।
ড্ৰাগছ সৰবৰাহকাৰীলৈ আৰক্ষীৰ গুলি।
কাকপথাৰত এনকাউণ্টাৰ ৷
আৰক্ষীৰ গুলিত আহত জিন্তু মৰাণ...
સેવા | પદયાત્રીકોની સેવા | સાળંગપુર | સાળંગપુર પદયાત્રા | કષ્ટભંજન દેવ |બોટાદ થી સાળંગપુર ૧૧૧ યાત્રા
સેવા | પદયાત્રીકોની સેવા | સાળંગપુર | સાળંગપુર પદયાત્રા | કષ્ટભંજન દેવ |બોટાદ થી સાળંગપુર ૧૧૧ યાત્રા