निविदा मंजूर होऊनही रस्त्याचे काम सुरू नाही- संभाजी आरमार

निविदा मंजूर होऊनही रखडलेले ठाकरे चौक ते गोदूताई परुळेकर नगर कुंभारी रस्त्याचे काम तात्काळ सुरु करा - संभाजी आरमार

निविदा मंजूर होऊनही रखडलेलं ठाकरे चौक ते गोदूताई परुळेकर नगर कुंभारी रस्त्याचे तात्काळ सुरु करावे अशी मागणी संभाजी आरमारने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. सोलापूर शहर हद्दीतील जुना कुंभारी मार्गावर ठाकरे चौक ते गोदूताई परुळेकर नगर कुंभारी हा रस्ता अतिशय खड्डेमय झाला आहे. याबाबत नागरिकांमधून सातत्याने ओरड होत असून जीवेघेणा प्रवास करावा लागत आहे. वारंवार अपघात घडत असून लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया देखील झालेली आहे. मात्र प्रत्यक्षात काम कधी सुरु होणार हे समजत नाही. गोदूताई परुळेकर नगर आणि परिसरात दाट लोकवस्ती आहे. हजारो लोकांची रोज या रस्त्यावरून ये-जा होत असते. वारंवार निवेदने, आंदोलने, मागणी करून देखील हजारो लोकांना रस्त्यामुळे भोगावा लागणार त्रास काही केल्या कमी होत नाही. तरी या निवेदनाद्वारे संघटेनची आपणास विनंती आहे की, मंजूर निविदेप्रमाणे तात्काळ या कामाची सुरुवात होऊन रस्त्याचे काम पूर्ण व्हावे. जेणेकरून त्या परिसरातील लोकांचा प्रवास निर्धोक आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. याप्रकरणी तात्काळ कार्यवाही न झाल्यास संभाजी आरमारला जनहितार्थ आंदोलन करावे लागेल असा इशारा संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, विभागप्रमुख सागर दासी, शाखाप्रमुख लक्ष्मण बोल्ली, शाखाप्रमुख महेश येमूल, नरेश अडकी नामदेव बोड्डू, जितेश चिनी, राजू आखाडे,राजू रच्चा, नवनाथ मस्के आदींनी दिला आहे.