भाजपचे तालुका सरचीटनीस लक्ष्मण पिराजी इलग यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल.
जलजिवन मिशन योजनेत बनावट कागदपत्रे दाखल करणे पडले महागात
जिंतूर :- २१ सप्टेंबर, भाजपचे तालुका सरचीटनीस तथा बलसा ग्रा.प.चे सदस्य लक्ष्मण पिराजी इलग रा.बलसा व किशोर विजयकुमार कद्रे पद्मनाभस डेव्हलपर्स प्रो.प्रा. परतूर यांच्यावर जलजिवन मिशन अंतर्गत बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी कलम, ४२०,४६७, ४६८, ४७१, ३४ न्वये जिंतूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी कि, ग्राम पंचायत पिंप्राळा- डोनवाडा ता.जिंतूर येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे ४४,४४,४९९/ रु चे काम मंजूर झाले होते. सदर कामाची रीतसर निविदा जिल्हा परिषद परभणी यांच्या मार्फत निघाली होती. त्यामध्ये किशोर विजयकुमार कद्रे पद्मनाभस डेव्हलपर्स प्रो.प्रा. परतूर यांना सदर काम सुटले होते. परंतु, पुढील प्रक्रियेस गावातील जनतेकडून १०% लोकवर्गणी ग्रा.प.चा ठराव घेऊन जलजिवन मिशन बँकेच्या खात्यात जमा करणे आवश्यक असते त्यासाठी भाजपचे तालुका सरचीटनीस लक्ष्मण पिराजी इलग रा.बलसा व किशोर विजयकुमार कद्रे पद्मनाभस डेव्हलपर्स प्रो.प्रा. परतूर यांनी ग्राम पंचायत पिंप्राळा- डोनवाडा च्या सरपंच सौ.जयश्री शिवाजी चाफे व ग्रामसेवक एस.डी.इंगळे यांना विचारात न घेता खोट्या सह्या व शिक्का मारून बोगस कागदपत्राच्या आधारे कामाची वर्क ऑर्डर करून घेतली होती.
त्या अनुषंगाने सरपंच यांनी सदर बोगस कागदपत्रावर आक्षेप घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यांनतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रीतसर सखोल चौकशी केली असता सदर कंत्राटदार दोषी आढळून आला, त्यामुळे सदर कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे पत्र सरपंच यांना देण्यात आले.