कन्नड : मोठ्या कठीण परिस्थितीचा व अनेक अडचणींचा सामना करत ही पतसंस्था स्व . वाहेदशेठ यांनी नावारूपाला आणली आहे . आता ती टिकवणे आपल्या सभासदांवर अवलंबून आहे . ही संस्था आपणा सर्व सभासदांची आहे . संस्थेकडून घेतलेले कर्ज कर्जदाराने वेळेच्या आत जमा केले पाहिजे , तरच संस्था टिकेल आणि ती चांगली चालेल व तिची प्रगती होईल , असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार नितीन पाटील यांनी रविवारी केले . कन्नड शहरातील बापूजी कन्नड तालुका बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी शहरातील गांधी भवन येथे घेण्यात आली . उद्योजक मनोज पवार , कौतिक पवार यांनी मनोगत व्यक्त केले . अॅड . राजेश कुलकर्णी यांनी माजी जैस्वाल , शिवकुमार सूत्रसंचालन , पतसंस्थेचे चेअरमन जावेद वाहेद यांनी प्रास्ताविक केले . व्हा . चेअरमन वाल्मीक लोखंडे यांनी आभार मानले . राजू चौहान , नगरसेवक खाजा राजमहंमद , अय्याज शहा , रऊफशेठ , साहेबखाँ पठाण , महावीर गंगवाल , संतोष ठोले , कमरोद्दीन शेख , नामदेव लवांदे , खरेदी - विक्री संघाचे सुरेश डोळस , सरपंच पांडुरंग घुगे , टी . एस . कदम यांची प्रमुख उपस्थिती होती . यशस्वितेसाठी संस्थेचे सचिव अशोक पवार , संचालक सांडू शेख बुढन , धरमचंद चुडीवाल , मुसा शेख जिलानी , लक्ष्मण राठोड , एकबाल शेख मेहताब , शारेक शेख जानी , मरियमबी स . सरदार , खालेदा बेगम अ . रजाक शेख रफिक शेख सुभान , जाकीर खान दिलावर खान यांनी परिश्रम घेतले . या वेळी विविध मान्यवर आणि सभासद , नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती