शिरूर-दि.२२(प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये लाखोंचा मराठा आरक्षण महामोर्चा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील दुसरा मराठा क्रांती महामोर्चा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ३ ऑक्टोबर २०२२ वार सोमवार रोजी होणार आहे.
हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक येथून आरंभ होईल ते तहसील कार्यालय शिरूर कासार येथे समाप्त होईल. सकल मराठा समाज शिरूर कासार तालुक्याच्या वतीने या मराठा क्रांती महामोर्चात लाखोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात तब्बल ५८ मोर्चे निघाल्यानंतर सुद्धा मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने पुन्हा एकदा राज्यातला मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळतोय. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये लाखोंचा मराठा आरक्षण महामोर्चा संपन्न झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे हा मराठा क्रांती महामोर्चा संपन्न होणार आहे.