आरणगावला आदर्श दुध उत्पादक संस्था पुरस्कार प्रदान

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

( शिक्रापूर प्रतीनिधी ) आरणगाव ता. शिरुर येथील फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेला पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने नुकताच आदर्श प्राथमिक सहकारी दुध उत्पादक संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

                                                  आरणगाव ता. शिरुर येथील फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेने गावातून मागील पाच वर्षापासून दररोज एक हजार दोनशे लिटर दुध संकलित करत त्याचा पुरवठा योग्य पद्धतीने केला, तर यापूर्वी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाच्या किटल्या बोनस म्हणून देत अनेक शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत तर दूध उत्पादक महिलांना पैठणीचे वाटप, दिवाळी दरम्यान सर्वात जास्त दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यास सुवर्ण मुद्रिका देऊन सन्मानित केले तर अनेकदा महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत, सदर दुध उत्पादक संस्थेच्या कार्याची दखल घेत संस्थेला पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने आदर्श प्राथमिक सहकारी दुध उत्पादक संस्था पुरस्कार पुणे जिल्हा दूध संघाच्या चेअरमन केशरताई पवार व पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे, यावेळी पुणे जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार, फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन तथा पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे, टाकळी भीमाचे पोलीस पाटील प्रकाश करपे, सुभाष कोकाटे, संतोष भालेराव, रमेश चव्हाण, हनुमंत कोकाटे, स्वाती लेंडे, कांचन चव्हाण, उषा कोकाटे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते, तर यावेळी बोलताना सदर पुरस्कार आमच्या फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेला मिळाल्याने आम्हाला आमच्या संस्थेच्या कामासाठी प्रोत्साहन मिळाले असल्याचे फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन तथा पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी सांगितले.