पुणे: सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यापिठाचे परीक्षा प्रमुख डॉ महेश काकडे यांनी महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाला याआधी दिलेल्या बीए एलएलबी आणि एलएलबीच्या शेवटच्या वर्षाच्या निकालासंदर्भातील त्रुटींबाबतीत चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यावेळी डॉ. महेश काकडे यांच्यासोबत विद्यार्थ्यांनासोबत 2 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली यावेळी सरांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक जिल्हयातून कंपनी लाँ , ऍडमिनीस्ट्रेटिव्ह लाँ , लँड लाँ या विषयाचे प्रत्येकी 5 पेपर निवडून फेरतपासणी करण्यात आली होती.मात्र विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये समाधानकारक उत्तरे लिहिलेली नसल्यामुळे गुण आधीच्या तपसणीपेक्षाही कमी दिले गेले आहेत.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
त्यामुळे पुन्हा परिक्षा घेण्यात येणार नसून फेरतपासणी मध्ये शंका असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासले जातील. अनेक विषयांचमध्ये समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच त्याविषयी चौकशी करून माहिती दिली जाईल. मनुष्यबळाअभावी वेळ लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र - गोवा कौन्सिलकडून सनद घेण्यासाठी शेवटच्या वर्षाच्या गुणपत्रिका लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात म्हणून निवेदन दिले होते. त्यावर तात्काळ कार्यवाही करून या आठवड्यात गुणपत्रिका कॉलेजमध्ये मिळतील अशी व्यवस्था केली आहे. 2019 - 2020 च्या द्वितीय सत्राची फी विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली स्थापना केलेल्या 6 जणांच्या कमिटीमार्फत कार्यवाही चालू झाली असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना फी परत केली जाईल अशी माहिती सरांनी दिली.
तसेच सर्व निकाल 10 ऑक्टोबर च्या आत लावणार आहेत असे सांगितले इतर विविध विषयांवर देखील सविस्तर चर्चा झाली. यावेळी महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक बेदरे , सचिव प्रविण कर्डिले जिल्हा कार्यकारणी सदस्य लखन दराडे , नासिर पाटील व नितीन मांडगे हे उपस्थित होते.