आमा आदमी पार्टीचा परळी, केज विधानसभेचा. कार्यकर्ता मेळावा अंबाजोगाई येथे आयोजित केला असून या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी केले .  

    बीड जिल्ह्यातील पंचायती राज निवडणुका लक्षात घेता आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या कार्यकर्ता मेळावा व बैठका घेत आहे त्या अंतर्गत परळी व केज विधान सभेचा मेळावा आंबेजोगाई या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे या मेळाव्यास मा. सुग्रीव मुंडे संघटन मंत्री मराठवाडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तरी सर्व नवीन जुन्या कार्यकर्त्यांनी व पार्टीमध्ये काम करू इच्छित असणाऱ्या आम आदमी पार्टीच्या विचारांना समर्पित असलेल्या 

नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित या विधानसभेतील नवीन व जुन्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी आम आदमी पार्टीने अंबाजोगाई येथे 23/09/22 शुक्रवार,दुपारी 02.00 वाजता शासकीय विश्रामगृह अंबेजोगाई येथे कार्यकता मेळावा आयोजित करण्यात येत आहे या कार्यकता मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा अध्यक्ष अशोक येडे तसेच जिल्हा सचिव रामघन जमाले अंबाजोगाई तालुका अध्यक्ष रामकृष्ण घुंडरे व सचीव अमोल शिंदे , यांच्याशी संपर्क साधा असे आव्हान आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.