बीड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते बीडच्या राष्ट्रवादी भवन येथे जयंत पाटलांच्या नेतृत्वात मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी बैठकीत दोन गट असल्याचे पहावयास मिळाले जयंत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण यांनी मोठी बॅनरबाजी केली होती
मात्र राष्ट्रवादी भावनाच्या इमारती समोरच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवारांना वगळल्याने अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली बॅनरवर अजित पवार धनंजय मुंडे आणि जयंत पाटील या तिघांचे फोटो पहावयास मिळाले या बॅनरवर स्वागत अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण हे होते
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार त्यानंतर सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासह बीड जिल्ह्यातील स्थानिक आमदार दिसून आले नाहीत त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याचे चर्चा पहावयास मिळाली.