वरणगावं येथे नुकतेच रामपेठ, श्रीकृष्ण मंदिर येथे भटक्या विमुक्त वंचित बहुजन आघाडी तर्फे विविध शासकीय महामंडळाच्या योजनेची माहिती नागरिकांना मिळावी,व गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळवा होण्यासाठी सदरचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.प्रमुख पाहुणे म्हणून एस. एल. गायकवाड, राज्य अध्यक्ष, भटक्या विमुक्त वंचित बहुजन आघाडी(सोलापूर) व नारायणराव गायकवाड(जेष्ठ नेते,भटक्या विमुक्त वंचित बहुजन आघाडी,पुणे) हे होते.

यामध्ये जळगांव येथील समाज कल्याण विभाग, जिल्हा उद्योग केंद्र,वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती महामंडळ, ओबीसी महामंडळ,महात्मा फुले विकास महामंडळ,साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ,चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याकआर्थिक विकास महामंडळ,अपंग वित्त महामंडळ, जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्र,खादी ग्रामउद्योग महामंडळ,आदी विभागातील  प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन, माहिती दिली.

तसेच जळगांव येथील सौ.लक्ष्मी सम्राट कुमावत ,सार्थक सिद्ध फाऊंडेशन अध्यक्षा, 350 पेक्षा जास्त लघु उद्योग माहिती, मन्यूफकचरींग ,135 पेक्षा सर्व्हिस सेक्कटर याविषयी मार्गदर्शन माहिती दिली.

 कार्यक्रमाचे आयोजक अंकुश रवींद्र गायकवाड( टीव्ही कलाकार तथा पत्रकार) धनश्री अंकुश गायकवाड( तालुका अध्यक्षा, स्वराज्य पत्रकार संघ) सोनिया रवींद्र गायकवाड( भटक्या विमुक्त महिला आघाडी प्रमुख) रवींद्र विजय गायकवाड( राज्य कार्याध्यक्ष, भटक्या विमुक्त वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य) यांनी केले.याप्रसंगी अरुण धनगर,बंडू कपाटे, सदाशिव भराडी,जितेंद्र भोई,सुनील भुसाडे,राजेश गुमळकर,कृष्णा धनगर,अजय जाधव,तुषार जाधव,वाल्मिक जाधव,इंगळे दादा,संपत पवार,भगवान वंजारी,रफीक शेठ यांच्या सह असंख्य महिला वर्ग आदी बहुसंख्येने उपस्थित होते.