गोरेगांवात शेतकरी आक्रमक,दूध सांडून घोषणाबाजी करत शासनाचा केला निषेध

सेनगांव तालुक्यातील गोरेगांव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बेमुदत संप सुरू असून संतप्त शेतकऱ्यांनी आज दिनांक 21 सप्टेंबर रोज बुधवारी  रोजीच्या सकाळी  रस्त्यावर दूध सांडून घोषणाबाजी करत शासनाचा जाहीर निषेध केला आहे.सेनगांव तालुक्यातील गोरेगांव,आजेगांव पुसेगांव आणि बाबुळगांव ही चार कृषी मंडळे अतिवृष्टी निधी मधून वगळल्याने शेतकऱ्यांनी गोरेगांव या ठिकाणी संप सुरू केला आहे.तर आज पर्यंत होऊन दूध सांडून घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला आहे.