स्व. संसदरत्न खासदार राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
औंढा नागनाथः- स्व.संसदरत्न खासदार राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्ताने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.औंढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी, जांब, राजापूर ,जलालदाभा , फुलदाभा , काकडदाभा, तामटी तांडा ,असोला, रेवनसिंग तांडा, लोहरा बुद्रुक, पवार तांडा, दरेगाव, काळापाणी तांडा, लक्ष्मण नाईक तांडा ,सावरखेडा, तळणी, संघनाईक तांडा ,दरेवाडी आदी शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेनचे साहीत्य वाटप करण्यात आले आहे.साहीत्य वाटप करतेवेळी जिल्हा परिषद सदस्य सुमनबाई रमेश जाधव ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, पंकज जाधव ,राहुल नागरे ,एस धनवे,डी कदम ,बबन हांडे बालाजी हांडे विशाल गवळी दत्ता ठोंबरे मारुती बेले बळीराम खोकले माणिक कर्डिले उत्तमराव कदम प्रभू वाघमारे रघुनाथ जाधव बापूराव राठोड रामदास जाधव पांडुरंग जाधव रुपेश जाधव लालू जाधव सदाशिव वरेड शिवाजी पवार सुभाष माने चंद्रकांत महाजन बंडू जावळे चंद्रकांत काशीदे अविनाश राठोड संजय राठोड वाघू पवार मारुती हाके दशरथ राठोड शेषराव पवार ब्रह्मा क-हाळे मंचक क-हाळे रुस्तुम पोटे यांच्यासह शिक्षकवृंद व काँग्रेसचे कार्यकर्ते साहित्य वाटप करतेवेळी हजर होते.