पैठण तालुक्यातील बिडकिन येथे औरंगाबाद येथील नामांकित सिग्मा हॉस्पिटल यांच्या वतीने बिडकिन ग्रामपंचायत कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंच सारिका मनोज पेरे, ग्रामसेवक अरुण गोर्डे यांच्या हस्ते आरोग्य शिबीराची चाचपणी व व्यवस्थित रित्या माहिती घेऊन सुरूवात करण्यात आली.सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद यांच्या वतीने बीपी,शुगर,व इतर मुख्य आजारांवर उपचार करत शस्त्रक्रिया करण्यासाठी चे आजार असतील तर ते हि महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना अंतर्गत केले जातील याबाबत हि माहिती सर्वांना देण्यात आली.सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद यांच्या वतीने १५ पदाधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी परिश्रम घेत १०० पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी व मोफत समुपदेशन आणि औषधी वाटप करण्यात आले...