हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल, शेतकरी धाय मोकलून रडू लागले..

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

"महसूल विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची"

पाचोड(विजय चिडे) हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक पावसाने मातीमोल झाले असल्याचे चित्र केकत जळगाव ता.पैठण येथे पाहावयास मिळत आहे.येथील शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे.या भागात पावसाचा प्रचंड जोर होता. त्यामुळे या परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जोरदार पावसामुळे झाल्याने बाजरी व कपाशी,उसाची उभी पिके भुईसपाट झाली आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा सुरुवाती पासूनच मन्सूरने साथ दिली असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठा आनंद निर्माण झाला होता.परंतु शेतकऱ्यांवर एका पाठोपाठ एक वेगवेगळे संकटे निर्माण होत आहे.

 यंदा शेतकऱ्यांने महागडी खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी करून कर्जबाजारी होऊन पिके जोमात आणले होते पण आत्ता हे पीक हातात आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज फिटणार होते मात्र पावसामुळे नुकसान झाले आहे तर आत्ता कर्ज फेडायच असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे.सलग दोन दिवस पावसाने जोरदार तडाखा दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात ऊस, मका, कापूस व बाजरीची पिके भुईसपाट झाली आहेत. 

सध्या बाजरी ची सोंगणी सुरू आहे; पण या पावसामुळे बाजरी जमिनीवर पडली आहे, तर मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कपासी च्या कैऱ्यां तुटून बाधांवर आल्या आहे. तब्बल दीड तास मुसळधार पाऊस झाल्याने पिकांची नासाडी झाली आहे.मका व बाजरीची कणसे भिजल्यामुळे नुकसान झाले. ऐन हंगामात नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. महसूल विभागाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी गणेश थोरे,ज्ञानेश्वर बबन खेडकर,धर्मराज पुंजाराम बढे,आबासाहेब पुंजाराम बढे,लक्ष्मण कचरु थोरे,अंबादास मल्हारी थोरे,कारभारी पाटील थोरे,आदिनाथ दौलत थोरे,नानासाहेब हरिभाऊ टेकाळे,सुधाकर श्रीधर थोरे आदी शेतकऱ्यांने केली.

चौकट-शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान.

कपाशी, उडीद, मूगही नियमितच्या पावसामुळे हातचे गेले आहेत. त्यामुळे यंदा मूग अन उडदाची डाळ न शिजण्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे नगदी पीक म्हणून असलेल्या सोयाबीनचा पूर्णपणे चिखल झाला आहे. सोयाबीनची कापणी तर करता येत नाहीच. मात्र, साचलेल्या पाण्यामुळे उभ्या सोयाबीनला शेंगामधूनच अंकुर फुटले आहेत. त्यामुळे ही सोयाबीन कापून विकण्यासाठीही उपयोगाची नाही. यासाठी डोक्यावरील कर्ज कसे फेडावे याची चिंता भेडसावत आहे.

चौकट-पीकाला बाजारात नेऊन काय करणार.

सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयाबीन हे काढणीयोग्य झालेले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले तर बाजारात भाव मिळत नाही. मातीमोल दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. एक दोन शेतकऱ्यांची सोयाबीन अकरा हजार रुपयाने घेतली गेली. आता ती पाच ते तीन हजाराच्यावर खरेदी केली जात आहे.