बीड (प्रतिनिधी) शहरातील मतदारांनी बीड नगर परिषद च्या आगामी निवडणुकीसाठी क्षीरसागर कंपनीकडून बोगस मतदान होऊ नये म्हणून सतर्क राहून आपापले मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करून घ्यावे. असे आवाहन MIM पक्षाचे शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर यांनी केले आहे.याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, नेहमीप्रमाणे क्षीरसागर अँड कंपनी बीड नगर परिषद च्या आगामी निवडणुकीमध्ये साम,दाम दंड भेद नीतीचा वापर करत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान नोंदणी करून घेत आहे. क्षीरसागरांनी नाव नोंदवलेल्या बोगस मतदारांचा एआयएमआयएम पक्ष आपल्या पातळीवर बुरखा फाडणारच आहे. परंतु शहरातील मतदारांनी सुद्धा तेवढेच सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण क्षीरसागर यांचे बोगस मतदार हे शहरासह ग्रामीण भागातून आलेले असतात. यामुळे ते तेव्हाच ओळखून येतात. आवश्यकता आहे ती फक्त मतदारांनी सतर्क राहायची. म्हणून संपूर्ण बीड शहरात कुठेही बोगस मतदार नोंदणी सुरू असेल किंवा लावून घेतली जात असेल तर एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्षांसह कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर यांनी केले आहे.
प्रभाग ६ तील मतदारांनी शहर कार्यालयात संपर्क साधावा
शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील मतदारांनी सुभास रोड दत्त मंदिर गल्ली मधील पक्षाच्या शहर कार्यालयात मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी यावे येताना सोबत मतदान कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन यावा. प्रभाग ६ मधील सर्व मतदारांचे मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करून दिले जाणार आहेत याचा लाभ घ्यावा. असे आवाहन शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर आणि पक्ष प्रसिद्धी प्रमुख सय्यद सैफ अली उर्फ लालू भैय्या यांनी केले आहे.