पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील सोनेगाव सौंदाना या गावात बस यत नसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना खुप ञास सहन करावा लागतो रोज दोन ते पाच कि मी शाळेतील मुला,मुलींना चालत जावा लागत असल्यामुळे गावकऱ्यांत प्रंचड चिड निर्माण झाली आहे यामुळे उपसरपंच संतोष कदम यांनी गावकऱ्यांना घेऊन पाटोदा आगार प्रमुखाची भेट घेत सौंदना व सोनेगाव गावा मध्ये बस सेवा तात्काळ चालू करावी नसता लोकशाही पद्धतीने आंदोलन करु अशी मागणी निवेदना द्वारे आगार प्रमुख यांना सोनेगाव सौंदाना गावचे उपसरपंच संतोष कदम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे राहुल चौरे,अरुण कदम,बंडु वाघमारे,रमेश कदम,कृष्णा कदम,
संजय कदय यांनी पाटोदा आगार प्रमुख यांना भेटून निवेदनाद्वारे केली असून लवकरात लवकर विद्यार्थ्याचे शालीय नुकसान होऊ नये म्हणून सोनेगाव व सौंदाना या गावा मध्ये बस आली नाही तर लोकशाही पद्धतीने आंदोलन करू आसा इशारा ही सौंदना सोनेगाव गावचे सरपंच व उपसरपंच यांच्या सह सर्व गावकर्यानी दिली आहे